Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

शिवसेना तालुका प्रमुखाने ३१ मुलांना घेतले दत्तक, परिसरातून कौतुकाचा वर्षाव

पलूस (अमर मुल्ला)
शिवसेनेचे पलूस तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरिब कुटुंबातील ३१ मुलांना दत्तक घेतले आहे. तसेच १३ डिसेंबर रोजी पलूस तालुक्यात जन्म घेतलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर १० हजार रुपयांची ठेव ठेवण्याचे जाहिर केले आहे. लेंगरे यांच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

शिवसेनेचे पलूस तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांचा वाढदिवस नुकताच विविध उपक्रमांनी साजरा झाला. यावेळी त्यांनी इतर खर्चाला फाटा देऊन ३१ मुलांना दत्तक घेतले. तसेच १३ डिसेंबर रोजी तालुक्यात जन्माला येणार्या मुलीच्या नावावर १० हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, प्रशांतच्या मागे शिवसेना खंबीरपणे आहे. प्रशांतला दोन वर्ष त्रास झाला पण कस लागावा म्हणून सोन्याला पण तापवतात. त्यामुळे सर्वांनी जोमाने काम करा. मी तुमच्या पाठीशी नक्की उभा राहीन.आता पलूस तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे. त्या मध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी ताकदीने ग्रामपंचायतिच्या निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करा.

तालुक्यामध्ये किमान १० हजार सभासद नोंदणी कारण्याची उद्धिष्ट ठेवून गावोगावी शाखा, घर तिथं शिवसैनिक निर्माण करा आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, उद्धव साहेबांना बळ देण्याच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून ताकदीने कामाला लागा असे आव्हान जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते यांनी केले आहे.

याप्रसंगी तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी पक्षाचा आदेश असेल त्या प्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये ताकदीने काम करू. संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत करू. प्रत्येक शिवसैनिकाला, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करू आणि गावोगावी शिवसेनेची सभासद नोंदणी असेल. शिवसेना शाखा असेल, प्रत्येक गावाच्या चौकात शिवसेनेचा बोर्ड लागला पाहिजे हे शिवसेनेचे उद्धिष्ट आहे. या पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वजनांना बरोबर घेऊन मी काम करीन आणि येणाऱ्या काळ निवडणूक शिवसेना हिरिरीने भाग घेऊन त्या ठिकाणी जिंकल्या शिवाय शिवसेना शांत व स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला आटपाडीचे युवानेते विनायक मासाळ, पलूस बँकेचे चेअरमन वैभवदादा पुदाले, सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब बापु पवार, सांगली शिवसेना शहरप्रमुख हरिभाऊ लेंगरे, भालचंद्र कांबळे, दत्ता हेगडे, प्रकाशआप्पा पाटील, रिपाईचे विशाल तिरमारे, शितल मोरे, राजू शेठ जानकर, एन. पी. खरजे, सांडगेवाडी चे शरदकाका शिंदे, यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात प्रशांत लेंगरे यांचे सर्व तरुण सहकारी मित्र व कार्यकर्ते भाऊ श्रीकांत, रोहित, व मित्र परिवार शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले.

Post a comment

0 Comments