Daily Mahasatta

Daily Mahasatta

मसुचीवाडी ग्रामपंचायत निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष

वाळवा (रहिम पठाण )
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.15 जानेवारी 2021 रोजी होणार्या मतदानामध्ये वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी गावचा समावेश आहे. अतिसंवेदनशील अशी समजली जाणारी मसुचीवाडी ग्रामपंचायत कायम गुरु शिष्यांच्या लढाईने चर्चेत असते. त्यामुळे यावेळी देखील संपूर्ण तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.

पंचायत समितीचे माजी सदस्य मा. दत्तू खोत (आप्पा) व मसुचीवाडी गावचे माजी सरपंच मा. सर्जेराव कदम (बापू) यांच्या गटात ही सरळ लढत होत असते. परंतु गेल्या पाच वर्षीत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे त्यामुळे यावेळीची लढत वेगळेच वळण घेईल असे वातावरण आहे. यावेळची लढत ही सरळ राजारामबापू समुह विरोध हुतात्मा समूह अशी होऊ शकते. हुतात्मा कार्यक्षेत्रातील 15 गावामध्ये मसुचीवाडीचा समावेश होत असल्याने त्यांचा ही गट गावामध्ये कार्यरत आहे. तर मा. नाम. जयंतरावजी पाटील यांचे हक्काचे गाव म्हणून ही मसुचीवाडीकडे पाहीले जाते, ते तसेच ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे सद्या प्रशासक नेमणूक आहे. गावातील विकासाच्या मुद्याबरोबरच भावबंदकीचे राजकारण ही होऊ शकते. यावेळी पुराच्या काळातील काही कळीचे मुद्दे हे निवडणूकी मध्ये रंग भरू शकतात. सध्या लोकांच्यामध्ये अंतर्गत चर्चाना मात्र उधान आले आहे. यावेळी कोण बाजी मारणार? यावर देखील चर्चा रंगायला लागल्या आहेत. इच्छूक ही चाचपणी करीत आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित. 

Post a Comment

0 Comments