Daily Mahasatta

Daily Mahasatta

पृथ्वीराज पाटील यांच्या सांगली शहर, ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगली शहर आणि ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

सांगली, (प्रतिनिधी)
पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उस्फूर्तपणे मतदान झाले. सांगली विधानसभा मतदार संघात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अरुणअण्णा लाड तर पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत आसगावकर हे निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आणि आज सकाळपासूनच सांगली विधानसभा मतदार संघातील शहरातील मतदान केंद्रांवर तसेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर जाऊन भेटी दिल्या.

सांगली शहरातील सिटी हायस्कूल, बापट बाल शिक्षण मंदिर, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, म. के. आठवले विनय मंदिर, ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला,, गुजराती हायस्कूल, दामाणी हायस्कूल, शांतिनिकेतन तसेच मिरज शहरातील मिरज हायस्कूल, आदर्श शिक्षण मंदिर, ज्युबिली कन्या शाळा, आणि बापूजी साळुंखे महाविद्यालय येथील मतदान केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या.

याशिवाय कुपवाड शहर, बुधगाव, कवलापूर, कसबे डिग्रज येथेही मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी भेटी दिल्या. महाआघाडीचे उमेदवार अरुणअण्णा लाड आणि प्रा. जयंत आसगावकर यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी कार्यकर्ते सकाळपासून सायंकाळपर्यंत धावपळ करताना दिसत होते. या कार्यकर्त्यांचे पाटील यांनी कौतुक केले.

जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, पदवीधरचे उमेदवार अरुणअण्णा लाड तसेच अन्य नेत्यांशीही त्यांनी या निवडणुकीबाबत चर्चा केली.

------------

Post a Comment

0 Comments