जत (सोमनिंग कोळी)
जत तालुक्यातील बाज येथे मामाच्या घरी आलेल्या नवविवाहित भाचीने मंगळवारी दुपारी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा धनाजी काळे (वय 22 ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने अचानक आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मामा बापू मुकुंद गडदे यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी मूळचे कवठेमंकाळ तालुक्यातील मानेवाडी येथील असणारी विवाहिता पुजा काळे ही चार दिवसापूर्वी आपले मामा बापू गडदे यांच्याकडे आली होती. तिचे चारच महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. पती धनाजी काळे हे नोकरीनिमित्त परराज्यात असल्याने बाजला मामाकडे आली होती. मंगळवारी तिचे मामाच्या घरी ऊस तोडणीसाठी मजूर आल्याने ते सगळे शेतात गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास पूजा ही घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने अचानक हा निर्णय का घेतला याचे कारण मात्र समजू शकले नाही तपास जत पोलीस करत आहेत.

0 Comments