Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवप्रताप अॅग्रोमॉल ची लकी ड्रॉ सोडत संपन्न

: येळावीचे दिपक साळुंखे ठरले पहिले मानकरी

विटा ( प्रतिनिधी)
येथील शिवप्रताप अॅग्रोमॉल तर्फे शेतकर्यांसाठी विविध कृषी उत्पादनाच्या खरेदीवर बक्षिसे ठेवली होती. त्याची सोडत B.V.G. ग्रुपचे चेअरमन मा. हणमंतराव गायकवाड यांचे शुभहस्ते पार पडला. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रतापराव (शेठ) दादा तसेच चेअरमन मा. विठ्ठलराव साळुंखे, मा. जयंतबाबा बर्वे उपस्थित होते.

दसरा ते दिवाळी हे आनंद आणि उत्साहाचे सण असतात. यावेळी शेतकर्यां चा आनंद द्वीगुणित करणेसाठी या दरम्यानच्या कालावधीमध्ये लकी ड्रॉ योजना ठेवली होती. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. बक्षीस वितरण प्रसंगी चेअरमन मा. विठ्ठलराव साळुंखे म्हणाले शिवप्रताप अॅग्रोमॉल हे 365 दिवसांचे कृषि प्रदर्शनच आहे. यामध्ये शेतीसाठी लागणार्या सर्व वस्तु उपलब्ध केल्या आहेत. खुरपणी पासून मळणी आणि सुतळी पासून वातीपर्यंत वस्तु विक्रीस उपलब्ध आहेत. मॉल मध्ये नेहमीच सणासारखा उत्साह असतो. वेळोवेळी अश्या स्कीम काढत राहू.

यावेळी पहिले बक्षीस 1) आटाचक्की - दिपक साळुंखे , येळावी 2) दुसरे बक्षीस- फ्रिज – उमेश उबळे , 3) तिसरे बक्षीस - LED टीव्ही – शिवाजी लवटे 4) चौथे बक्षीस - मोबाईल – आनंदराव पाटील, 5) पाचवे बक्षीस मिक्सर – सुनिता कदम हे बक्षिसाचे मानकरी ठरले.

Post a Comment

0 Comments