Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास 30 लाखांचा निधी : आ. विक्रमसिंह सावंत

जत ( सोमनिंग कोळी)
जत तालुक्‍यात ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होईल, त्या ग्रामपंचायतीला आमदार फंडातून तीस लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली आहे.

कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या फंडातून जत तालुक्‍यात ज्या ग्रामपंचायत बिनविरोध होतील त्यांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचे बक्षीस म्हणून देण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना जाहीर केली आहे.

कोरोनामुळे जत तालुक्‍याची खूप मोठी हानी झाली आहे. अजूनही कोरोनाचा धोका संपला नाही. जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने त्यांचे जीवन विस्कळित झाले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतचे नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 

या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये यासाठी आमदार सावंत यांनी जत तालुक्‍यासाठी ही संकल्पना मांडली आहे. जत तालुक्‍यात ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होईल, त्यांना आमदार फंडातून 30 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या काळामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातील वाद - विवाद, गट - तट बाजूला ठेवत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी. गावातील होतकरू, निर्व्यसनी, योजनांची माहिती असणाऱ्या तरुणांनी व सर्व ज्येष्ठांनी आपल्या गावासाठी सहभागी व्हावे. यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल, असे मत आमदार सावंत यांनी व्यक्त केले आहे. 

Post a comment

0 Comments