Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

खानापूर तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान

विटा ( मनोज देवकर )
खानापूर तालुक्यातील तेरा ग्रामपंचायती च्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. देवीखिंडी , मंगरूळ , तांदळगाव , मेंगाणवाडी , रेणावी , खंबाळे (भा.) , शेंडगेवाडी , भडकेवाडी , पारे , माहुली , नागेवाडी , पोसेवाडी , भिकवडी (बु.) या गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. 

सरपंच निवड पूर्वीप्रमाणे सदस्यांतून होणार आहे. इच्छूक लोकांच्या आरक्षणाकडे नजरा आहेत.
खानापूर तालुक्यातील आरक्षण : अनुसूचित जातीसाठी - ९ ( सर्वसाधारण ४ व महिला -५) )
नागरिकांचा मागास प्रवर्ग - १७ ( सर्वसाधारण ८ व महिला ९) खुल्या प्रवर्गासाठी -३८ ( सर्वसाधारण १९ व महिला १९ )

पुढच्या आठवड्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार आहे. तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होईल . निवडणुकीचा व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिली.

Post a comment

0 Comments