Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

Mahasatta Effect ...अन् पेठ - इस्लामपूर रस्त्याच्या कामाला सुरवात झाली

पेठ (रियाज मुल्ला)
         ' पेठ-इस्लामपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा ' या मथळ्याखाली महासत्ता सांगली न्यूज पोर्टलवर दणदणीत वृत्त प्रकाशित झाले होते. या बातमीचा इफेक्ट होऊन रस्त्याच्या कामाला आज दुपारी तात्काळ सुरुवात झाल्याने प्रवासी व वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे.
         पेठ- इस्लामपूर -सांगली महामार्गावर रोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. पेठ पासून इस्लामपूर पर्यंत लहान-मोठ्या खड्डयांचं साम्राज्य पसरलं होत. हे खड्डे चुकवताना अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली होती. हा एकेरी रस्ता असल्याने खड्डे चुकविताना होणाऱ्या छोट्या छोट्या अपघातातून हमरीतुमरी, मारामारी असले प्रकार बऱ्याच प्रमाणात होत होते. मात्र महासत्ता सांगली पोर्टलच्या बातमीतून या पेठ-इस्लामपूर रस्त्याविषयी आवाज उठवला गेला व तात्काळ रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात झाल्याने वाहन धारक प्रवासी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Post a comment

0 Comments