Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत आयुक्तांची अनोखी भाऊबीज, कोव्हीड योद्धाचे कुटुंब भारावले

सांगली : कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करताना आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहूल रोकडे व अन्य. 

सांगली (प्रतिनिधी)

सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना सांगली महापालिकेच्या कोव्हीडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या घरात सन्नाटा होता. मात्र महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज आपल्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात जाऊन आपली भाऊबीज साजरी केली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले.

सांगली महापालिका क्षेत्रात कर्तव्य बजावत असताना 10 मनपा कर्मचारी हे कोविडमुळे मृत्युमुखी पडले आहेत. आपला जीव जोखमीत घालून त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे यंदा या कर्मचाऱ्याच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. आपला माणूस कर्तव्य बजावत असताना मयत झाला त्यामुळं या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यामुळे आपला माणूस गमावलेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपली भाऊबीज आणि दिवाळी साजरी केली. यावेळी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आयुक्त कापडणीस यांनी आधार देत त्यांना धीर दिला.

आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह उपायुक्त राहुल रोकडे आणि मनपा क्रीडाअधिकारी महेश पाटील, प्रमोद रजपूत यांनी मृत कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन या कुटूंबाला आम्ही आपल्या सोबत आहोत असा धीर दिला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या आधारामुळे महापालिका कर्मचाऱ्याचे कुटुंब मात्र भारावून गेले.

Post a Comment

0 Comments