Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अरुण लाड यांच्या विजयासाठी युद्धपातळीवर काम करा : पृथ्वीराज पाटील

सांगली, ( प्रतिनिधी)
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाआघाडीचे पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील उमेदवार अरुण अण्णा लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना निवडून आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. बैठकीला महापालिका क्षेत्र तसेच मिरज पूर्व भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.


श्री. पाटील म्हणाले, महाआघाडीचे दोन्ही उमेदवार अत्यंत अभ्यासू आणि धडाडीने काम करणारे आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय तसेच बूथनिहाय नियोजन करण्यात आले. १ डिसेंबर, २०२० रोजी ही निवडणूक होत आहे. कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करावा तसेच आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या उमेदवारांना पसंती क्रमांक १ चे मतदान करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे. आपले उमेदवार पसंती क्रमांक एकच्या मतदानांमध्येच निवडून आले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

प्रारंभी बिपीन कदम यांनी प्रास्ताविक केले. संजय मेंढे, रणजित देसाई, अजित दोरकर, जावेद मुल्ला, अल्ताफ पेंढारी, अमित पारेकर यांनी सूचना मांडल्या. पैगंबर शेख यांनी आभार मानले. बैठकीला जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, नगरसेवक मंगेश चव्हाण, चंद्रकांत आंबी, नितीन चव्हाण, अजय देशमुख, रवी खराडे, सनी धोतरे, वसीम रोहिले, अरविंद पाटील, अण्णासाहेब खोत, टी. डी. पाटील, पिंटू दुबल, शेखर पाटील, नितीन चव्हाण, मनोज नांद्रेकर, अमोल पाटील, श्रीनाथ देवकर, माणिक कोलप, महेश कोळी, संतोष भोसले, नितीन मिरजकर, हिंमत पाटील, गणेश घोरपडे, प्रशांत देशमुख, ताजुद्दीन तांबोळी, राजेंद्र कांबळे, सागर काळे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, सुलेमान मुजावर, आशिष चौधरी, जावेद मुल्ला, वारे सर, नानासाहेब घोरपडे, सिकंदर मुल्ला, दिलीप धोतरे, पवन महाजन, समीर मुजावर, मंदार काटकर, बेबीनंदा चिगटेरी, प्रशांत मोहिते, विष्णु वसवाडे, नितीन भगत, उत्तम पाटील, बाहुबली कबाडगे, रणजित देसाई, रमेश जाधव, अशोक रासकर, सचिन पाटील आदि उपस्थित होते.
-----


Post a comment

0 Comments