Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ऊसतोड मुकादमाकडून तीस लाखांचा गंडा

ः विटा, कडेगाव, तासगाव तालुक्यातील लोकांची फसवणूक

विटा ( प्रतिनिधी)

ऊसतोडीसाठी मजुरांचा पुरवठा करतो असे सांगून विटा, तासगाव आणि कडेगाव तालुकतील चौघा ऊस वाहतुक कंत्राटदारांची सुमारे 30 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील संशयित कुबेर शिवाजी चव्हाण (वय-29 रा. हिंगणी ता. माण जि. सातारा) याच्या विरोधात विशाल धनाजी पाटील (रा. विटा) यांनी विटा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

याबाबत विशाल पाटील यांनी दिलेली माहिती अशी, आमच्या मालकीचा  ट्रॅक्टर असून तो आम्ही श्री दत्त इंडिया प्राव्हेट लिमिटेड ( वसंतदादा पाटील कारखाना) येथे ऊस वाहतुकीस लावला आहे. संबंधित कुबेर शिवाजी चव्हाण हा ऊसतोडीसाठी मजुर पुरवत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार कुबेर चव्हाण यांच्या घरी जावून आम्ही ऊसतोड मजुर पुरविण्याची त्याच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी शंभर रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार केला. या करारानुसार वेळोवेळी आम्ही चव्हाण याला आठ लाखांची उचल दिली आहे व त्याच्याकडून लेखी घेतले आहे.

त्याचप्रमाणे ऊस वाहतुक कंत्राटदार आनंदराव वसंतराव पाटील (रा. बोरगाव, ता. तासगाव) आणि रविंद्र तुकाराम माने (रा. शिवणी ता. कडेगाव) यांचे प्रत्येकी आठ लाख तर अधिक काळभैरी पाटील (रा. मतकुणकी ता. तासगाव)  यांचेकडून सदर मुकादम यांनी सहा लाख रूपये असे आम्हा चौंघाचें एकूण 30 लाख रूपये ऊसतोड मजुर पुरवणसाठी घेतले आहेत. मात्र गेल्या महिनभरापासून हा ऊसतोड मुकादम बेपत्ता आहे. त्याचा मोबाईल देखील बंद आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीकडून आमची रक्कम वसूल करून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments