Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सावधान...धोका पुन्हा वाढतोय, आज खानापूर तालुक्यात आठ पॉझिटिव्ह

विटा ( मनोज देवकर )
आज खानापूर तालुक्यात आठ जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तालुक्यात एकशे सोळा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जनतेने अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये विट्यातील चार रुग्णांचा समावेश आहे.

माहुली येथील दोन , खानापूर येथील एक , व साळशिंगे येथील एक रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. अनेक लोक विना मास्क विटा तसेच ग्रामीण भागात फिरताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोविड होऊ नये या साठीची लस वितरीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ती प्रत्यक्ष भारतातील ग्रामीण भागात येण्यासाठी अजूनही काही महिने लागू शकतात. सर्व रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता सारखी नसते. त्यामुळे लोकांनी अजूनही काळजी घ्यावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

Post a comment

0 Comments