Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जत येथील राजाराम बापू युनिटचा गळीत हंगाम शुभारंभ

जत ( सोमनिंग कोळी)
जत येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखाना ( युनिट 4 तिप्पेहळ्ळी) गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन पी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय पाटील, कार्यकारी संचालक आर. डी माहुली, देवराज पाटील,शसुवर्णा पाटील, मेघा पाटील, आनंदराव पाटील, शिवलीग कबाडगी, विराज शिंदे, उत्तम चव्हाण, बाळ सावंत, विठ्ठल पाटील, दादा मोरे, मच्छिद्र वाघमोडे, सुहास चव्हाण, आयुब सय्यद, रियाज शेख,राजू मुल्ला,नंदू साळुंखे,प्रताप शिंदे यांच्या सह शेतकरी व ऊसतोड वाहतूकदार उपस्थित होते.

यावेळी चेअरमन पी. आर. पाटील म्हणाले की जत तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखाना बंद होता. जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील यांनी महापुराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात दिल्यामुळे व समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असून त्यामुळे युनिट चार पूर्ण क्षमतेने चालू राहणार आहे. त्यातच शेजारी असणारा कवठेमहांकाळचा कारखाना यावेळीं बंद असल्याने युनिट 4 साठी ऊस मिळणार आहे. त्यामुळे 3 लाख टन गाळपचे उद्धिष्ट पूर्ण होणार आहे. तालुक्यातील युवकांना प्रथम प्राधान्य देऊन रोजगार देणार आहे. तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला घालण्याचे आव्हान केले.व त्याचबरोबर इतर कारखान्यांच्या तुलनेत ज्यादा दर दिला जाईल.

Post a Comment

0 Comments