Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

: १३८ बॅग झाले रक्त संकलन

इस्लामपूर (प्रतिनिधी)

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ग्रुप सांगली यांचेवतीने इस्लामपूर येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री रायबा मालुसरे (नरवीर तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज) यांचे हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये १३८ बॅग रक्त संकलन करण्यात आले .

या शिबिरासाठी समाजसेवकांनी मदत केली आहे. यामध्ये श्री. सर्जेराव यादव प्रतिष्ठान तर्फे हॉल उपलब्ध करून दिला होता तर श्री दिलीप पाटील यांनी शाल नारळ दिले होते. तर रक्तदात्यासाठी विवेकानंद पाटील यांनी केळी तर दत्ता खोत साहेब यांनी सफरचंद देऊन मदत केली. यावेळी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ग्रुप सांगलीचे दीपक मोरे, सर्वेश यादव, प्रवीण निकम, सुहास चव्हाण, योगराज पाटील, सुरज साळुंखे, उमेश पाटील, प्रसाद अनुगडे, वैभव पाटील, राजकुमार जगताप, सूयेश पाटील, सौरभ मोरे, सौ. माया जाधव, आणि सुप्रिया नलगे यांचेसह पूर्ण सांगली अॅडमीन परिवार आणि बांधव उपस्थित होते. रक्त संकलन करणेसाठी सिद्धिविनायक ब्लड बँक मिरज येथील डॉक्टर व स्टाफ उपस्थित होते .

Post a comment

0 Comments