विटा हद्दितील महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा : किरणभाऊ तारळेकर

विटा : तहसीलदार ॠषिकेत शेळके यांना निवेदन देताना किरणभाऊ तारळेकर, दहावीर शितोळे, सुभाष भिंगारदेवे, फिरोज तांबोळी, अविनाश चोथे, धर्मेश पाटील, संजय सपकाळ, भरत कांबळे, कुलदीप भिंगारदेवे.

विटा (प्रतिनिधी)
        विटा नगरपरीषद हद्दीतील शिवाजीनगर ते नेवरी नाका व चिरवळ ओढा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हे दोन्ही रस्ते महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे मृत्यूचे सापळे बनले आहेत. त्यामुळे विटा हद्दितील महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
      याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,
शहर हद्दितील या रस्त्यामध्ये मोठे खड्डे असल्यामुळे लोकांना वाहने चालवताना खूप कसरत करावी लागत आहे. कराड रोड हा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे या रस्त्याचे ठेकेदार तात्पुरते खड्डे मुजवत आहेत. मात्र जादाच्या पावसाने पुन्हा खड्डे पडले आहेत. हनुमान मंदिर ते महादेव हॉटेल पर्यंत रस्ताच शिल्लक नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे खड्डे कोणाचातरी जीव घेण्या अगोदर रस्त्याच्या ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घ्यावे. त्याचबरोबर नेवरी रोडला बोरमळा ओढा व काकडीचा ओढा याठिकाणी सतत पाणी वाहत असलेने खड्ड्यांचा अंदाज लोकांना येत नाही. त्यामुळे बरेच अपघात याठिकाणी झाले आहे. मग प्रशासन कोणच्या तरी मृत्यूची वाट बघत आहे का ? असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
        तरी प्रशासनाने लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून संबधीत ठेकेदाराकडून रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे अन्यथा आम्हाला जनआंदोलन उभा करावे लागेल. अशा आशयाचे निवेदन विटा नगरपरिषदेचे नगरसेवक मा किरण तारळेकर, मा दहावीर शितोळे, मा सुभाष भिंगारदेवे, मा फिरोज तांबोळी, मा अविनाश चोथे, मा धर्मेश पाटील, मा संजय सपकाळ, मा भरत कांबळे, मा कुलदीप भिंगारदेवे यांनी तहसिलदार खानापुर यांना दिले आहे. 

Must readPost a comment

0 Comments