महसूल मंत्र्यांना दिले एक लाख सह्यांचे निवेदन

: शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे रद्द करण्याची मागणी ; कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम आणि पृथ्वीराज पाटील यांची उपस्थिती

सांगली, (प्रतिनिधी)

केंद्र सरकारने केलेला शेतकऱ्यांविरोधातील कायदे रद्द करावे, या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना दिले. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम उपस्थित होते.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला आहे, या काळ्या कायद्यांना काँग्रेसने तीव्र विरोध केला असून गेली दोन महिने त्याविरोधात आंदोलने चालू आहेत. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून राष्ट्रपतींना सह्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. त्यासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शेतकऱ्यांच्या एक लाख सह्या असलेले पत्र ना. थोरात यांच्याकडे सादर करण्यात आले.
---------

Post a comment

0 Comments