Daily Mahasatta

Daily Mahasatta

पदवीधरांच्या हक्कासाठी निवडणूक लढत आहे : मा. अभिजीत शिंदे

वाळवा ( रहिम पठाण)

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी अपक्ष उमेदवार अभिजीत विलासराव शिंदे हे निवडणूक लढवत आहेत एक उच्चशिक्षित व पदवीधरांना स्पर्धा परीक्षेचे व्यासपीठ उपलब्ध करुन काम करण्याचा मानस उराशी बाळगून काम करीत आहेत.

अभिजीत विलासराव शिंदे हे बोरगाव ता. वाळवा गावचे आहेत. B. sc, M.B.A. पदवीधारक आहेत. 2013 पासून स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करुन ते अधिकारी होण्याचे युवकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करीत आहेत.

स्पर्धा परीक्षा मधील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून ते काम सतत करीत आहेत.2020 ची निवडणूक लढण्याच्या पाठीमागील त्यांचा मानस विचारला असता त्यानी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत.

1. पदवीधर बेरोजगाराना बेरोजगार भत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
2. शिक्षक भरती पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करने.
3. कंत्राटी पध्दती बंद करने.
4. गाव तेथे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे.
5. मुलींचे पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत करणे.
6. पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणे.
7. मराठा व धनगर आरक्षणासाठी प्रयत्न करणे

असे मानस डोळ्यासमोर ठेऊन ही निवडणूक लढवत असल्याचे अभिजित शिंदे यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments