Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

इस्लामपूरातून चौघा अट्टल गुंडाची टोळी हद्दपार

इस्लामपूर ता.( सूर्यकांत शिंदे )
इस्लामपूर शहरातील चार गुंडांना तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गुंडेश ऊर्फ सागर सुनकाप्पा कुचीवाले (वय-२३) (टोळी प्रमुख), ३) रामा यल्लाप्पा कुचीवाले (वय-३६) ३) रूपेश राजेंद्र पवार (वय-२१) ४) आकाश रामा कुचीवाले (वय-२४) सर्व रा.
माकडवाले वसाहत इस्लामपूर अशी हद्दपार केलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलीस अधिक्षक सांगली, अपर पोलीस अधिक्षक सांगली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर यांनी इस्लामपूर पोलीस ठाणे हददीतील संघटीत टोळयामधील या चौघांविरुध्द हददपारिचा प्रस्ताव सादर करणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरिक्षक नारायण देशमुख यांनी
गुंडेश ऊर्फ सागर सुनकाप्पा कुचीवाले, रामा
यल्लाप्पा कुचीवाले, रूपेश राजेंद्र पवार, आकाश रामा कुचीवाले (सर्व रा. माकडवाले वसाहत इस्लामपूर) या टोळी विरूध्द् गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ते न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतरही अशाच प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आहेत.

त्याच्या अशा संघटीत टोळीचे कृत्यामुळे इस्लामपूर परिसरातील नागरिकांना त्यांचा नाहक त्रास होत आहे. त्यांच्यामुळे शहरातील लोकांमध्ये दहशत व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या टोळी विरूध्द् महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी हदपार प्रस्ताव पोलीस अधिक्षक सांगली यांना सादर केलेला होता. या प्रस्तावाची चौकशी करून पोलीस अधिक्षक सांगली यांनी या चौघांना सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून १ वर्ष कालावधीसाठी हद्दपार केलेचे आदेश पारित केले आहेत. इस्लामपूर शहरातील आणखीन काही टोळ्याविरुध्द् कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली नारायण देशमुख (पोलीस निरिक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे) , पोलीस नाईक शरद जाधव, पोलीस नाईक अरूण पाटील, गणेश शेळके,आलमगीर लतीफ ,प्रशांत देसाई यांनी ही कार्यवाही केलेली आहे.

Post a comment

0 Comments