Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

चोरटा जेरबंद, पाच लाखांचे मोबाईल जप्त

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
तासगाव - मिरज रस्त्यावरील तानंग फाटा येथे स्वीप्ट कारमधून चोरीचे मोबाईल घेऊन निघालेल्या अट्टल चोरट्यास कुपवाड पोलीसांनी जेरबंद केले असून या चोरट्याकडून स्वीप्ट कार आणि सुमारे ४ लाख ७७ हजार रुपये किमतीचे ५० जुने मोबाईल जप्त केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तासगावहून एक इसम चोरीचे मोबाईल घेऊन मिरजेच्या दिशेने जाणार असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत संशयित शाहरुख जावेद शेख (वय 27 रा. पेठभाग गवळी गल्ली, सांगली) यास तानंग फाटा येथे ताब्यात घेतले. यावेळी स्वीप्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ४ लाख ७७ हजार रुपये किमतीचे अॅपल, सॅमसंग, व्हिवो, ओपो, रेडमी असे विविध कंपनीचे ५० मोबाईल आढळून आले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मोबाईल फोन चोरीचे असल्याचे कबुली दिली .
याप्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक एस. एस. पाटील तपास करत आहेत.Post a Comment

0 Comments