Daily Mahasatta

Daily Mahasatta

यशवंत कारखाना दोन वर्षात उच्चांकी दर देणार : खासदार संजयकाका पाटील


विटा - नागेवाडी येथील यशवंत शुगर च्या गळीत हंगामाचा प्रारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी प. पू. पारसनाथ बाबा, प. पू. आनंदगिरी महाराज, खा. संजय पाटील, वैभव पाटील, अशोक गायकवाड, सुहास शिंदे.

विटा : प्रतिनिधी
यशवंत कारखाना येत्या दोन वर्षात पब्लिक लिमिटेड करणार आहोत. त्यामुळे सभासदांना मालकाचा दर्जा मिळेल. तसेच को- जनरेशन आणि डिस्टलरी सारख्या उपपदार्थां सह लिफ्ट इरिगेशन, गट शेती वगैरे सर्व प्रकल्प राबविणार आहोत आणि ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देणार अशी ग्वाही यशवंत शुगर चे चे अध्यक्ष आणि खासदार संजय पाटील यांनी दिली.

नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ आज प. पू. पारसनाथ बाबा आणि प. पू. आनंद गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, मनमंदिर उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक गायकवाड विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहासनाना शिंदे, शंकर मोहिते, मिरजेचे गोपाळ महाराज पटवर्धन, किशोरभाऊ चाळीसगावक , कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. जी. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

खा. पाटील म्हणाले, स्वर्गीय संपतराव नानांनी हा कारखाना उभा केला मधल्या काळात काही अडचणी आल्या त्यामुळे कारखान्याचे जिल्हा बँकेने विक्री केली त्या वेळी आम्ही हा कारखाना विकत घेतला त्यानंतर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या. गेल्या दोन वर्षापासून आम्ही कारखाना सुरळीतपणे सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र अनेक अडचणी आणि खडतर प्रयत्नातून आपण मागे एकदा सुरू केला होता त्यावेळी आम्हाला काही कारणामुळे कारखाना नीट चालवता आला नाही. बँकांची कर्जे मिळवता आली नाहीत. परिणामी कारखान्याचे आधुनिकिकरण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कारखाना ज्या क्षमतेने चालवायला पाहिजे होता तो चालवू शकलो नाही.

तासगावच्या कारखान्याचे सगळे प्रश्न ह्यावर्षी संपले. त्यानंतर चार महिन्यां पूर्वी तो आमच्या ताब्यात आला. त्यावेळी शंकर नानाना मी म्हटलं तासगाव कारखाना आपण पहिल्यांदा चालू करू, तो एकदा स्थिरस्थावर झाल्यानंतर मग पुढच्या वर्षी इथला चालू करू. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी इथल्या शेतक ऱ्यांना भेटून विश्वास दिला. त्यानंतर त्यांच्यामार्फत मला सांगितल्यानंतर मी हा 'नागेवाडी' सुरू करण्याची भूमिका घेतली. यावेळी आम्ही निश्चितपणे इथल्या परिसरातले कारखाने ऊस उत्पादकांना जो दर देतील तोच दर देऊ.
अशोकभाऊ गायकवाड म्हणाले, यशवंत कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा ही तमाम तालुकावासीयांची इच्छा आहे, त्यासाठी संजयकाका जी धडपड करत आहेत ती कौतुकास्पद आहे, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, कारखाना चालवताना भांडवलाची गरज पडली तरी आम्ही कृतीशील मदत करणार आहोत अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, अन्य कारखाने सुरू होणे यापेक्षा यशवंत कारखाना सुरू होणे याला महत्त्व आहे, यशवंत हा कारखाना स्व संपतराव नानांनी मोठ्या जिद्दीने उभा केला. हा कारखाना आपणा सर्वांची अस्मिता आहे, काकांनी त्याला गतवैभव प्राप्त करून द्यावे, आम्ही सर्व ताकतीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत, आज मी राजकारणात कोठेही असो, माझे राजकीय भवितव्य काहीही असो पण मी खा. संजयकाकानाच गुरू मानतो, खासदार कसा असावा, किती कामाचा असावा आणि जनतेसाठी किती स्वस्त असावा हे काकांनी दाखवून दिले आहे असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले .यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, अशोक गायकवाड, यांचीही भाषणे झाली. आभार शंकर नाना मोहिते यांनी मानले.


Must read...
बाॅलीवुड स्टार अभिनेत्याची आत्महत्या 

Post a Comment

0 Comments