Daily Mahasatta

Daily Mahasatta

अल्पवयीन मुलीस पळविले, चार वर्षानी आरोपी जाळ्यात

: चिंचणी - वांगी पोलिसांची कामगिरी
कडेगाव (सचिन मोहिते)
        आरोपी रंजीत सुरेश कदम (वय 27 वर्ष रा. शेळकबाव) याने शेळकबाव येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून घेऊन गेला होता. याबाबत चिंचणी - वांगी पोलीस ठाण्यात मे 2016 मध्ये पिडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
         या प्रकरणातील आरोपी कदम हा चार वर्षापासून फरार होता. त्याचा तपास पोलिस करीत होते. परंतु आरोपी याने कोणत्याही व्यक्तीशी संपर्क ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांना यश येत नव्हते. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व मनीषा दुबुले अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच श्री अंकुश इंगळे पोलीस विभागीय पोलीस अधिकारी विटा यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपी ची तांत्रिक माहितीच्या आधारे चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी अहोरात्र प्रयत्न करून माहिती संकलित करून पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अमर जंगम पोलीस नाईक विशाल साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल राहुल कुंभार यांचे एक पथक तयार करून सदर आरोपींचा शोध घेणे कामी दहिवडी जिल्हा सातारा या परिसरात रवाना केले. आरोपी व त्याच्या सोबत असलेली पिडित मुलगी याची माहिती घेऊन कारवाई केली. गेली चार वर्षापासून फरारी आरोपी रणजीत सुरेश कदम राहणार शेळकबाव यास आज ता. ६ रोजी अटक करून पीडित मुलीचा शोध लावला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष गोसावी करीत असून सदर आरोपी सत्र न्यायालय सांगली यांनी दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केले आहे .

Post a Comment

0 Comments