पोट फाडून घेऊन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या


जत (सोमनिंग कोळी)

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सदाशिव व्हनखडे (वय 66) यांनी आजाराला कंटाळून स्वतः पोट फाडून घेऊन आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार मंगळवारी पहाटे घडला आहे. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने संख व तिकोंडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्याच्या पूर्वेकडील संख प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सदाशिव व्हनखंडे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. काही दिवस त्यांच्याकडे जत तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार होता. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसापासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. मंगळवारी त्यांचे मूळ गाव असणाऱ्या तिकोंडी थेथील त्यांच्या घरातील हाॅलमध्ये झोपले होते.

अनेक वर्षा पासून पोटाच्या आजाराने त्रस्त असलेल्या डॉ. व्हनखंडे यांना वेदना असह्य झालेने त्यांनी स्वतः दोन भूलीचे इंजेक्शन करुन घेऊन पोट कापून घेतले यातून आपले प्राण जात नाही असे वाटल्याने हाॅल मधून रक्तबंबाळ अवस्थेत खाली आले पोर्च मध्ये लावलेल्या स्कुटी मधून पेट्रोल काढून अंगावर ओतून पेटवून घेतले. शरीरातून बराच वेळ मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्याने व भाजून घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे करीत आहेत.
Post a comment

0 Comments