संग्रामसिंह देशमुख यांचा विजय निश्चित : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

पुणे (प्रतिनिधी)

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे भारतीय जनता पक्षाचे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा संपन्न झाल

इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मतदार नोंदणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पुणे ग्रामीण मध्ये सर्वाधिक मतदार आम्ही नोंदविले आहेत. निवडणूकी दिवशी बूथ नियोजन तयार झालेले आहे. मला विश्वास आहे, की भाजपच्या संग्राम संपतराव देशमुख यांना सर्वाधिक मते मिळतील. भविष्यातील अन्य निवडणुकीची ही तयारी असेल म्हणून आम्ही पूर्ण तयारीने या निवडणुकीत उतरणार आहोत असे प्रतिपादन मा. हर्षवर्धन पाटील यांनी केले

यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष मा. गणेश भाऊ भेगडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा मा प्रदीप पाटील, सचिव पुणे जिल्हा भाजपा मा. तानाजीराव थोरात, सरचिटणीस पुणे जिल्हा मा. सुदर्शन चौधरी, सरचिटणीस पुणे जिल्हा मा. धर्मेंद्रजी खांडरे, भाजपा अध्यक्ष इंदापूर तालुका मा. गणेश जामदार, निरा भिमा सहकारी साखर कारखाना संचालक मा. अशोक पाटील, पुणे जिल्हा सरचिटणीस मा. अविनाश मोटे, पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष मा. ऋतुजा ताई जाधव, तसेच भारतीय जनता पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments