Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाडमध्ये भाजपच्यावतीने वाढीव वीज बिलाची होळी

कुपवाड : नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन प्रसंगी रवींद्र सदामते, विश्वजीत पाटील, कृष्णा राठोड प्रमुख उपस्थित होते.

कुपवाड (प्रमोद अथणीकर )
'कोरोना' संसर्गाच्या कालावधीतील वाढीव विजबिले त्वरीत माफ करावीत, या मागणीसाठी कुपवाड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने थोरला गणपती चौकात वाढीव विजबिलांची होळी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत निदर्शनेही करण्यात आली.

भाजपाचे नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते, शहर जिल्हा सचिव विश्वजीत पाटील, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कृष्णा राठोड प्रमुख उपस्थित होते. यावेळी नगरसेवक ढंग म्हणाले की, राज्य शासनाने 'कोरोना' संसर्गाच्या काळात जनतेची मदत करण्या ऐवजी लुबाडणूक करण्याचे काम केले आहे.

वीज बिलाबाबत राज्य शासनाने केवळ घोषणाबाजी करून जबाबदारी झटकली आहे. 'कोरोना' काळात वाढून आलेले विज बिले कमी करु असे सांगितले होते. परंतु नंतर त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे दिलेला शब्द न पाळणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. यावेळी सुभाष सरगर, प्रकाश पाटील, महेश पटेल, संजय नाईक, अशोक सुतार, महेश निर्मळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a comment

0 Comments