Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

राज्य सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी : रणधीर नाईक


शिराळा (राजेंद्र दिवाण)
राज्य सरकार सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्या मध्ये पूर्णतः अपयशी ठरली आहे. पदवीधर व शिक्षक निवडणुकीत भाजपा च्या दोन्ही उमेवाराना विजयी करून महाविकास आघाडी सरकार ला नापास करा. भाजपा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी दिली.

मांगले तालुका शिराळा येथे पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक परिषद भाजपाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचार निमित्त आयोजित पदवीधर, शिक्षक बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार,माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजप नेते सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्ष उषाताई दशवंत, माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, शिराळा तालुका काँग्रेस अध्यक्षा सुखदेव पाटील, जि. प. सदस्य संपतराव देशमुख, के. डी. पाटील, माजी सभापती मायावती कांबळे, प्रल्हाद पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले -पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे. राज्यात आघाडीचे सरकार जनतेचा भ्रमनिरास करत आहे. शैक्षणिक प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या सरकारचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही. शेतकरी अडचणीत आहे त्याना कसलीही मदत या सरकारकडून होत नाही. अशा परिस्थितीत या सरकारला धडा शिकवण्याची ही वेळ आहे. महा विकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव करून या सरकारला नापास करा.

सत्यजित देशमुख म्हणाले- भाजपने पदवीधर पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये तरुण व उच्चशिक्षित उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत सर्वांनी जागृत पणे काम करावे, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मतदान करून घेणे आवश्यक आहे. दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतील. असा विश्वास यावेळी देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी जितेंद्र पवार, भगवानराव साळुंखे,यांनीही मनोगत मनोगत व्यक्त केले.

उपसरपंच धनाजी नरूटे, राजन पाटील,बाबा पाटील, कांदे उपसरपंच शशिकांत पाटील, दीपक पाटील, उत्तम गावडे, सुभाष पाटील, विजय पाटील, भीमराव गराडे, तानाजी खोत, बबन यशवंत, अरविंद पाटील, जयसिंग देसाई, आदीसह पदवीधर, शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments