Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कडेगाव तालुक्यातील एकाची विट्यात आत्महत्या


विटा प्रतिनिधी
    वडियेरायबाग ता. कडेगाव येथील युवराज जगन्नाथ वाघमोडे (वय 49) याने    विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज रविवार तारीख 8 रोजी पहाटे उघडकीस आली आहे.
    वडियेरायबाग येथील युवराज वाघमोडे हा मोलमजुरीचे काम करत होता. काही दिवसापासून तो दहिवडी येथील बाळूमामाच्या मेंढ्या मागे सेवेकरी म्हणून काम करत होता. काल तो विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात आला. आज पहाटे त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन  पंचनामा केला. वाघमोडे याच्या पाठीमागे आई, बायको, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.


 

Post a comment

0 Comments