Daily Mahasatta

Daily Mahasatta

पदवीधर निवडणूकीत कोण कोणासोबत हे कळेलच : राज्यमंत्री विश्वजीत कदम

विटा ( मनोज देवकर )

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांनी आघाडी घेतली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. विटा येथे उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांनी, शिवसेनेची नेते मंडळी आपल्या सोबत आहेत, मात्र कार्यकर्ते कुठेही दिसत नाहीत. नेमका हा काय प्रकार आहे ? शिवसेनेचा पाठींबा कोणाला आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. मात्र मंत्री विश्वजीत कदम यांनी कोण कोणासोबत आहे ते तुम्हाला लवकरच कळेल, असे सांगत शिवसेना पूर्ण ताकदीने मदत करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पदवीधर चे एक लाख पासष्ट हजार मतदान आहे. पाच जिल्ह्यात अडुसष्ठ हजार मतदान शिक्षक मतदार संघात आहे. दोन्ही उमेदवार सर्व तालुक्यात फिरत आहेत. अरुण अण्णा लाड व प्रा. जयंत आसगावकर या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. तिन्ही पक्षाचे नेते , कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. अडचण वाटली तर संबंधित नेत्यांशी चर्चा करू असे कदम म्हणाले.

Post a Comment

0 Comments