Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अरुण लाड यांच्या पाठीशी वाळवा तालुका ठाम पणे उभा राहील : देवराज देशमुख

वाळवा ( रहिम पठाण)
पुणे पदवीधर निवडणूकी मध्ये क्रांतीच्या विचारांचा वारसा असणारे एक प्रामाणिक व्यक्ती मा. अरुण आण्णांच्या पाठीमागे नी वाळवा  तालुुका   ठामपणे उभे राहील  असे मत वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष  देवराज देशमुख यानी आढावा बैठकीत व््यक्त केले.

बो रगाव ता. वाळवा येथे पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा. अरुण गणपती लाड(आण्णा ) यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न झाली. पदवीधरांच्या प्रश्नांची मांडणी करून त्याची सोडवणूक करण्यात आण्णा अग्रभागी राहतील. असे ही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार हे नक्कीच पदवीधरांना योग्य न्याय देईल. युवकांच्यासाठी राज्य सरकार अनेक नवनविन गोष्टी घेऊन येत आहे ज्या मधून त्यांचे रहाणीमान कसे सुधारता येईल याचाही विचार होत आहे असे बोलताना म्हणाले त्याच बरोबर वाळवा तालुक्याचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाम. जयंतरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान होईल हा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला.

बैठकीसाठी युवराज कांबळे जावेद पटेल आसीफ मुल्ला उमेश नाईक कुमार भोकरे श्रीकांत नाईक इंद्रजित पाटील व युवक राजारामबापू सह. साखर कारखाना व क्रांती सहकारी साखर कारखाना कामगार पदाधिकारी उपस्थित होते संजय लोंडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments