Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नवोदय, शिष्यवृत्ती परिक्षेत एकता कांबळे हिचे नेत्रदीपक यश

माहुली : रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. आबासाहेब (काका) देशमुख यांच्या हस्ते एकता कांबळे हिचा सत्कार करण्यात आला.

विटा (प्रतिनिधी)
वलखड ता खानापूर येथील कु. एकता कांबळे हिने नवोदय प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवले. या यशाबद्दल कु. एकता उत्तम कांबळे हिचा महात्मा गांधी विद्यामंदिर माहुली येथे मा. आबासाहेब (काका) देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वलखड गावची सुकन्या कु. एकता उत्तम कांबळे हिने वलखडमध्येच आपले सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून केले. तर इयत्ता आठवीसाठी तिने महात्मा गांधी विद्यामंदिर माहुली इथे प्रवेश घेतला होता. आठवीच्या वर्गात शिकत असताना तिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिली. या दोन्ही परीक्षांमध्ये तिने धवल यश प्राप्त केले आहे. तिची नवोदय विद्यालय पलूस येथे निवड झाली आहे. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ती ग्रामीण भागात अनुसूचित जातीमध्ये खानापूर तालुक्यात पहिली व जिल्ह्यात बारावी आली आहे.

तसेच या दोन्ही परीक्षांमध्ये असे यश प्राप्त करणारी एकता ही एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. या यशाबद्दल नुकताच तिचा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. आबासाहेब (काका) देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. बागल सर, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे सहा. इन्स्पेक्टर मा. सावंत साहेब, सतिश पाटील, शाळेचे शिक्षक, माहुली, वलखड गावचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments