Daily Mahasatta

Daily Mahasatta

आईनेच केला १३ दिवसाच्या बाळाचा खून, अवघ्या काही तासात खूनाचा उलगडा

: माळवाडी ता. पलूस येथील घटना
पलूस ( अमर मुल्ला)
         आज बुधवारी सकाळी माळवाडी ता. पलूस येथे अवघ्या १३ दिवसाच्या नवजात बालकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलीसांनी या घटनेचा काही तासात छडा लावला असून या बाळाच्या आईनेच त्याच्या आजाराच्या कारणातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी, माळवाडी- वसगडे रस्त्यावर असणाऱ्या पाटील मळा येथे अवघ्या 13 दिवसाच्या बालकाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली, अशी माहिती भिलवडी पोलीसांनी देण्यात आली . याबाबतची फिर्याद उत्तम धोंडीराम माळी यांनी पोलिसांत दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासादरम्यान आईनेच या मुलाचा खुन केल्याचे निष्पन्न झाले.

       याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की माळवाडी ता. पलूस येथील पाटील मळ्यात राहणारे उत्तम धोंडीराम माळी यांची ऐश्वर्या अमितकुमार माळी ही मुलगी आहे. त्यांच्या मुलाला जन्मानंतर शौचास त्रास होत होता. त्यामुळे फक्त दोनच दिवसात त्यांनी विश्रामबाग येथील डाॅ. सुधीर जाधव यांच्याकडे ऑपरेशन केले होते. बालकाला संडास करण्यासाठी पोटातून बाहेर नळी काढल्याने त्यास त्रास होत होता. तो त्रास बघवत नसल्याने मुलाच्या आईला नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्या मातेने बेडरूममधून त्या बाळास उचलून घराच्या वर असणाऱ्या टेरेसवरती पाण्याने भरलेल्या टाकीत टाकून त्याचा खून केला. अधिक तपास भिलवडीचे सपोनि कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल जगताप करत आहेत.

Post a Comment

0 Comments