कडेगाव ( सचिन मोहिते)
सामाजिक कामे कुशल पद्धतीने कशी करायची याचा आदर्श घालुन देणारे व पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे
काम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले आहे. युवकामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे संग्रामसिंह देशमुख यांना पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी कडेगाव पंचायत समितीचे सदस्य रवींद्र ठोंबरे यांनी केली आहे.
रवींद्र ठोंबरे म्हणाले, पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेले अभ्यासू नेतृत्व. सांगली जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे पुणे पदवीधर मतदार संघात प्रभावी उमेदवार असुन भाजपने संग्रामसिंह देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी. त्यांच्या उमेदवारीतच विजय असल्याने पक्षाच्या नेत्यांनी इतर कोणालाही उमेदवारी न देता कायम जनसंपर्कात असलेल्या संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कडेगांव पंचायत समितीचे सदस्य रविंद्र ठोंबरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे .
0 Comments