Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

शेतकऱ्यांना वीज कनेक्शन बाबत वाट पहावी लागणार नाही : राज्यमंत्री विश्वजीत कदम

विटा (मनोज देवकर )

सन २०१४ ते २०१९ या काळात कोणाचे सरकार होते ? या काळात लाखो शेतकऱ्यांना वीज कनेक्शन का मिळाली नाहीत. ? असा सवाल करत त्यांनी न केलेली कामे आम्ही पूर्ण करत आहोत .राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसली की कोणत्याही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या वीज कनेक्शन बाबत वाट पहावी लागणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी, सामाजिक न्याय व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले. विटा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेल्या नऊ महिन्यापासून राज्यसरकार कोरोनाच्या प्रादुर्भावाशी लढत असताना राज्याला आर्थिक चणचण भासत आहे. आज आर्थिक आणीबाणी सारख्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. एकूण देशांतर्गत उत्पादना ची टक्केवारी ( जी. डी. पी.) वजा तेवीस टक्के इतकी खाली आली आहे. अश्या परिस्थितीत केंद्र सरकार कडून राज्याला अठरा हजार कोटी निधी येणे बाकी आहे.

अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. आरोग्य विभागाला सुसज्ज केलं. ग्रामीण रुग्णालये सुसज्ज केली. कृषी वीज जोडणीच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहेत. २०२८ पर्यंतचीही वीज जोडणी तातडीने करणे गरजेचे आहे. एवढी वर्षे वीज जोडणी प्रलंबित राहणे योग्य नाही. पण २०१८ पर्यंत सरकार कुणाचे होते? किमान त्यांच्या कार्यकाळातील प्रलंबित वीज जोडणी आम्ही पूर्ण करत आहोत ही चांगली गोष्ट आहे. त्यापुढील प्रलंबित जोडणी संदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेईल. असे कदम म्हणाले.

Post a comment

0 Comments