Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात आदर्श शिक्षकांना ' रोटरी नेशन बिल्डर्स अॅवार्ड ' प्रदान

विटा : पुरस्कार वितरण करताना रोटरीचे प्रांतपाल, संग्राम पाटील, उपप्रांतपाल प्रविण दाते, रोटरीचे शहराध्यक्ष सुधीर बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विटा (प्रतिनिधी)
       शिक्षक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी विटा रोटरीच्या वतीने विटा शहर व परीसरातील चाकोरीबाहेर जाऊन उपक्रमशील योगदान देणाऱ्या शिक्षकांना रोटरी नेशन बिल्डर्स अॅवार्डने गौरवीले जाते. मात्र यावर्षीच्या कोविडमुळे हा पुरस्कार सोहळा काल बुधवार ता. ४ रोजी रोटरीचे प्रांतपाल कोल्हापूरच्या मार्व्हलस इंडस्ट्रीचे चेअरमन संग्राम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
        श्री. पंडित पोपट पाटील, श्री. प्रताप विष्णू टकले, श्री. संतोष गणपत जाधव, सौ. निर्मला सुनिल यादव, श्रीमती शारदा दिलीप यादव, श्री सुदाम ईश्वर होलमुखे या गुणवंत आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. रोटरीचे अध्यक्ष सुधिर बाबर यांनी स्वागत केले. सचिव रोहित दिवटे यांनी प्रास्ताविकामध्ये रोटरीच्या परंपरांचा व विविध समाजउपयोगी उपक्रमांची माहिती देत शिक्षक दिनानिमीत्त समस्त शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात समाजात उपक्रमशिल शिक्षणाच्या आधारे समाजपरीवर्तनाचे योगदान देत असलेल्या शिक्षकांचा गौरव केला जात असल्याचे नमुद केले. 
          या प्रसंगी शिक्षकांना रोटरी नेशन बिल्डर्स अॅवार्डने सन्मानीत करण्यात आले. सत्कारमुर्तींनी आपल्या मनोगतामध्ये प्रस्ताव न मागविता समाजातुन मिळालेल्या माहितीच्या आधारावर मिळत असलेल्या या रोटरी पुरस्काराचे अनमोल महत्व असुन यामुळे आम्हास आणखी प्रेरणा मिळेल असे मनोगत व्यक्त केले. रोटरी प्रांतपाल संग्राम पाटील यांनी समाजबांधणीमध्ये शिक्षकांचे योगदान अमोल असुन शिक्षक हा मातृहृदयी व चारित्र्य संपन्न असणे अनिवार्य असल्याचे मत व्यक्त केले. उपप्रांतपाल प्रविण दाते यांनीही मनोगत व्यक्त केले.
          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल देशमुखे व सुशांत भागवत यांनी केले. याप्रसंगी रोटरी परिवारातील किरण तारळेकर, प्रविण दाते, डाॅ. राम नलवडे, डाॅ. अविनाश लोखंडे, सुरेश म्हेत्रे, सुशांत भागवत, लक्ष्मणराव जाधव, डाॅ. प्रताप वलेकर, कुलदीप बाबर, डाॅ. सत्यजीत साळुंखे, डाॅ. सुशांत वलेकर, अमोल माने, संजय भस्मे, अमृत निंबाळकर, प्रफुल्ल निवळे, निळकंठ भस्मे, दिलीप चव्हाण, कुमार चोथे, मिलींद चोथे, भीमाशंकर जंगम, सागर म्हेत्रे या रोटरी सदस्यासह व परीसरातील शिक्षक बंधुभगीनी उपस्थित होते.
Post a Comment

0 Comments