Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठच्या दुर्ग वाड्यात रंगला आयपीएल चा थरार


पेठ : येथील मुंबई इंडियन्स समर्थकांनी प्रोजेक्टर वर 10 बाय 12 च्या भव्य पडद्यावर फायनल मॅच चे आयोजन केले.

पेठ (रियाज मुल्ला )

येथील दुर्ग वाड्यात आयपीएल च्या मुंबई विरुध्द दिल्ली कॅपिटलस या अंतिम सामन्याचा थरार चांगलाच रंगला. मुंबई इंडियन्स समर्थकांनी सुमारे 10 बाय 12 च्या भव्य पडद्यावर या सामन्याचे आयोजन केले होते. कर्णधार रोहित शर्माच्या धडाकेबाज अर्ध शतकामुळे मुंबई इंडियन संघाने पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले आणि पेठ येथील मुंबई इंडियन च्या समर्थकांनी दिवाळी पूर्वीच मोठा आनंदोत्सव साजरा केला.

सोशल डिस्टनसचे काटेकोर पालन करीत या फायनल मॅच चे आयोजन पेठ येथील दुर्ग वाड्यात करण्यात आले होते. कोरोनामुळे च्या महामारी मूळे एप्रिल मे मध्ये होणारे IPL चे सामने ऑक्टोबर मध्ये घेण्यात आले होते. दिल्ली ला हरवून मुंबई फायनलला गेली अन अन फायनल ची मॅच मोठ्या पडद्यावर करायचे आयोजन करण्यात आले. 2020 चा IPL चषक मुंबई इंडियन ने आपल्या नावे करताच मध्य रात्रीच मुंबई समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची अतिषबाजी करीत दिवाळीच्या अगोदरच दिवाळी साजरी केली.

या फायनल मॅचचे भव्य पडद्यावर आयोजन प्रदीप पाटील, संदीप पाटील, प्रतिक जाधव, सौरभ जाधव , सागर भांबुरे, दिलीप पाटील, विनायक बेडके, सतीश पाटील, लखन सपकाळ, अक्षय कदम, सुरज लोहार , सोन्या कदम, संतोष बाबर, दिगबंर कुलकर्णी, विश्वजीत पाटील, बजरंग गुरव आदी व समस्त मुंबई इंडियन फँन्स पेठ यांनी केले होते.Post a Comment

0 Comments