Daily Mahasatta

Daily Mahasatta

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल

पुणे : संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील, मा. खास. गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

पुणे ( प्रतिनिधी)
        
      भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्रामसिंह देशमुख ( सांगली) यांचा उमेदवारी अर्ज आज ११ रोजी विधान भवन पुणे येथे दाखल करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मा. खासदार गिरीशजी बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहिर होताच भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदवीधर मतदारसंघातील विविध जिल्ह्यातून भाजप पदाधिकारी यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. आज बुधवार ता. ११ रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

यावेळी भाजपचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाळा भेगडे , आम. जगदीश मुळीक, पुणे महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री मा. दिलीप कांबळे मा. अमलजी महाडिक, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, माजी आमदार योगेशजी टिळेकर, पुणे महानगरपालिका माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, अॅड. सचिनजी पटवर्धन, राजेशजी पांडे, गणेश बिडकर, हेमंत रासने पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर यांचे उपस्थितीत पुणे पदवीधर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. संग्राम देशमुख (भाऊ) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments