Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मंदिरांचे टाळे तोडणे हे काम दरोडेखोरांचे, वारकऱ्यांचे नव्हे : हभप सचिन पवार

मुंबई ( मनोज देवकर )
       वारकरी हे सहिष्णू आहेत. कोरोनाच्या काळात वारकऱ्यांनी दाखवलेली शिस्त व केलेले सहकार्य अतुलनीय आहे. त्यांना सामाजिक जबाबदारीचे भान आहे. समाजाची काळजी आहे. असे असताना मंदिरे उघडली नाहीत तर मंदिरांचे टाळे तोडू अशी आक्रस्ताळी भाषा वारकऱ्यांची नाही. टाळे तोडणे हे दरोडेखोरांचे काम आहे, अशी टीका हभप सचिन पवार यांनी केली आहे.  सचिन पवार हे संत साहित्याचे अभ्यासक , व्याख्याते व तरुण कीर्तनकार आहेत . ''वारकरी दर्पण'' या ''वारकरी संप्रदायाचे मुखपत्राचे संपादक आहेत.
        वारकऱ्यांचे नेतृत्व वारकऱ्यांनी करावे. योग्य वारकरी प्रतिनिधी प्रशासनासमोर येत नाहीत. त्यामुळे प्रशासन व वारकरी यांचा सुसंवाद होत नाही. वारकरी संप्रदायाला माहीत नसलेले, संप्रदायात विश्वसनीय नसलेले लोक प्रतिनिधित्व करायला जातात. त्यामुळे गोंधळ वाढतो, असे पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. जरी यात नाव लिहलेले नसले तरी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वावर सचिन पवार यांनी प्रशचिन्ह उपस्थित केले आहे.
      विषय वारकऱ्यांचे , साऱ्या आंदोलनाला बळ वारकऱ्यांचे, मात्र चमकोगिरी भलत्यांची हे खपवून घेतले तर वारकऱ्यांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, असा इशारा सचिन पवार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Post a comment

0 Comments