Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलूस मध्ये २ लाख २२ हजारांची दारू जप्त

पलूस : उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई

पलुस (अमर मुल्ला)

         तालुक्यात अवैध धंद्यांना उधान आलेले असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे व त्यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाई ने अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले. तालुक्यात अवैद्य धंदे जोमात चालू असल्याची चर्चा वेळोवेळी ऐकायला मिळत होती. त्यामुळे गोपनीय माहिती मिळताच धडक कारवाई केली.
        
        सांगली जिल्ह्यातून बेकायदेशीर अवैद्य धंद्यांचा समुळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम साहेब यांनी पोलीस यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करताना तासगाव उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग चालू केले आहे. हवलदार काळे, पोलीस नाईक पाटील यांना तोंडी आदेश देऊन पेट्रोलिंग करण्यास सांगितले होते. पेट्रोलिंग करीत असताना पलूस पलुस पोलिस स्टेशन हद्दीत विनापरवाना देशी-विदेशी दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला . टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता २,२२,७६८ रुपयांची देशी विदेशी दारू टेम्पो मध्ये आढळून आली. 
          
          सापडलेली दारू व टेम्पो जप्त करून आरोपी पंडित धोंडीराम डुबल वय ४० वर्षे राहणार बांबवडे तालुका पलुस याचेवर मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ इ. प्रमाणे पलुस पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांचे मार्गदर्शनाखाली तासगांव कार्यक्षेत्रातील अवैद्य धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचा अजेंडा उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी ठेवला आहे.

Post a Comment

0 Comments