Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

डाॅक्टरांचा बंगला फोडून १५ लाखांचा मुद्देमाल लंपास

शिराळा (राजेंद्र दिवाण)
मांगले वारणानगर रस्त्यावर डॉ. बी. एन. पाटील यांच्या गंधा नर्सिंग होम दवाखान्याच्या दाराच्या कुलपाची कडी उचकटून लॉकरमधील २९ तोळे सोने दहा भार चांदी व रोख ५० हजार रक्कम अशी एकूण १५ लाखाची जबरी चोरी करून अज्ञात चोरट्यानी पोबारा केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली

डॉ. पाटील शनिवारी (ता. २१) सर्व कुटुंबासह कराड येथे नातेवाईकांकडे गेले होते. आज सकाळी शेजारच्या लोकांनी दूरध्वनीवरून दवाखान्याचा दरवाजा उघडा असल्याचे डॉ. पाटील यांना सांगितले. त्यानंतर पहाणी केली असता चोरट्यानी दवाखान्याचे कुलूप उचकटून डॉक्टर राहत असलेल्या पहिल्या मजल्या वरील बेडरूम मधील तिजोरी शेजारी असणा-या टेबलमधील लॉकरच्या चाव्या घेवून दागिने व रोख रक्कम लंपास केली यावेळी चोरट्यानी तिजोरीतील कपडे व इतर समान अस्ताव्यस्त विस्कटून टाकले होते .

मांगले वारणानगर रस्त्यावर डॉ. पाटील यांचा गंधा नर्सिंग होम दवाखाना आहे. डॉक्टर पाटील शनिवारी कुटुंबासह कराड येथे नातेवाईकांकडे गेले होते. चोरट्यानी याच संधीचा फायदा घेवून डल्ला मारला. मात्र शनिवार ते मंगळवार दरम्यान नेमकी कोणत्या दिवशी चोरी झाली आहे हे समजू शकलेले नाही,

डॉ. पाटील आज दुपारी निरोप समजल्या नंतर आले त्यावळी दवाखान्याच्या दरवाजाचे कुलूप उचकटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिराळा पोलिसांना कळविले. त्यांनतर शिराळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी सांगलीहून श्वान पथक आणण्यात आले. श्वानाने वारणानगर रोडवर दोनशे मिटर पर्यंत माग दाखवला व त्याच परिसरात घुटमळले. रात्री उशीरा डॉ. बी. एन. पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील अधिक तपास करीत आहेत .

Post a comment

0 Comments