नेर्लेत ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड, आधार फाउंडेशनकडून फराळ वाटप

पेठ ( रियाज मुल्ला)

नेर्ले ता. वाळवा येथील आधार फाउंडेशन च्या वतीने ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ व मिठाई वाटप करण्यात आले. त्यामुळे या ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड झाली आहे.

एकीकडे दीपावलीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बीड, उस्मानाबाद, कर्नाटक, धुळे आदी भागातून ऊसतोड मजूर आपल्या तांड्या सहित मजुरीच्या निमित्तानं नेर्ले परिसरात आले. माळरानावर खोप्या उभ्या करून उसतोडी करून गुजराण करणारे ऊसतोड मजुरांना व त्यांच्या मुलांना आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला.

आधार फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ऊसतोड मजुरांच्या ४० झोपडीत जाऊन फराळ वाटप करण्यात आले. यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष विजय लोहार उपाध्यक्ष हर्षद पाटील,सचिव विजय निकम, अमोल कुंभार, सचिन गवारकर, संतोष खरमाटे, सुशांत लोहार, नारायण लोहार,उत्तम गुरव, हणमंत पाटील, अजिंक्य कुलकर्णी,पांडुरंग कुलकर्णी यांनी संयोजन केले. गावातील महिलांचा फराळ वाटपासाठी लक्षणीय वाटा होता.

Post a comment

0 Comments