संशयित ताब्यात : कॉपीराईटप्रकरणी पोलीसांची कारवाई
कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
: शहरातील महात्मा गांधी गृह निर्माण हौसिंग सोसायटीमध्ये युरेका फोब्स कंपनीचे हलक्या दर्जाच्या वाटर फिल्टरचा सुमारे ४८ लाख ९२ हजाराचा माल तयार करून त्यावर मुळ कंपनीचे लेबलद्वारे विक्री करण्याकरीता साठवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टनुसार सुनील गंगाधर अथणीकर (वय ४०) या संशयितावर ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.
कुपवाड पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी आहे की, शहरातील महात्मा गांधी हौसिंग सोसायटीमध्ये बालाजी एंटरप्रायजेस नावाच्या पुर्वाभिमुकी घरामध्ये संशयित सुनील अथणीकर हा युरेका फोब्स कंपनीचे (एमएलटी कॅन्डल) हलक्या दर्जाच्या वाटर फिल्टरचा बनावट माल तयार करून त्यावर मुळ कंपनीचे लेबल लावून विक्री करण्याकरीता साठवणूक केली होती.
त्याची किंमत ४८ लाख ९२ हजार पाचशे रूपये आहे. याप्रकरणी आशिष शरद पाटील, प्रोपायटर सह्याद्री कॉपीराईट प्रोडक्शन फर्म (रा. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी तपासणी केली. यामध्ये मल्टी लेअर कँडलचे १०३ बॉक्स मिळून आले. याप्रकरणी ४८ लाख ९२ हजार पाचशे रूपये इतक्या किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. संशयित सुनील अथणीकर याच्यावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीसाकडून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

0 Comments