पलूस युवासेनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन साजरा

पलूस (अमर मुल्ला)

पलूस येथील स्व. लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय पलूस येथे वंदनिय हिंदुह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कोरोना पार्श्वभूमीवरती अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी युवासेना तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत अनेक मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. बाळासाहेबांचे विचार नव्या पिढीस प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास अस्लम नदाफ यांनी व्यक्त केला. त्यावेळी सुजित घोरपडे, युवराज गोंदिल,
समरजित पवार, अजित राजमाने,श्रीरंग सांडगे,गौस मुल्ला, संदीप कुंभार, ओंकार हंकारे, अक्षय ठोंबरे, सुमित कुंभार, शैलेश गिड्डे,संजीव घाडगे, बाळू अत्तार लक्ष्मण चौगुले आदी युवा सैनिक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments