Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा प्रांत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम

विटा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष श्रमदान शिबीर स्वच्छता श्रमदान मोहीमेत प्रांताधिकारी संतोष भोर, उपनगराध्यक्ष संजय तारळेकर, शिक्षण सभापती ॲड विजय जाधव, उपप्रांताधिकारी रोहीनी सगरे, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत यांनी सहभाग घेतला.

विटा ( प्रतिनिधी)

       स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण विटा शहरांमध्ये प्रभावीपणे सुरु असून याअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता श्रमदान आयोजित करून परिसर स्वच्छता करण्यात येत आहे. स्वच्छता श्रमदान मोहिमेत आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विटा येथील प्रांत कार्यालय व परिसराची स्वच्छता करण्यात आली .

       विटा नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियाना मध्ये गेली चार वर्ष सातत्याने काम करून शहराला सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर सन्मान मिळवून दिला आहे. दैनंदिन स्वच्छता, परिसर स्वच्छता, स्वच्छता श्रमदान मोहीम तसेच स्वच्छतेबाबत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करणे. नागरिकांच्या मध्ये शहर स्वच्छतेसाठी प्रबोधन करणे अशा विविध पद्धतीने शहरात अग्रेसर स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे. स्वच्छता श्रमदान मोहीम सातत्याने शहरातील विविध ठिकाणी घेऊन शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न विटा पालिका व नागरिक करत आहेत. प्रांत कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करून सर्व परिसर स्वच्छ आणि सुंदर केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा शहर स्वच्छतेमध्ये देशपातळीवर अव्वल ठरेल. शहरातील नागरिकांनी शहर स्वच्छतेच्या मोहीमेत सक्रिय योगदान द्यावे असे प्रतिपादन प्रांताधिकारी संतोष भोर यांनी केले आहे.
         प्रांतकार्यालय येथे घेतलेल्या स्वच्छता श्रमदान मोहीमेत प्रांताधिकारी संतोष भोर, मा. उपनगराध्यक्ष संजय तारळेकर, शिक्षण सभापती ॲड विजय जाधव, उपप्रांताधिकारी रोहीनी सगरे, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, यांचेसह प्रांतकार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विटा नगरपरिषदेचे पदाधिकारी, सर्व वॉर्ड अॉफीसर, सहाय्यक, कर्मचारी, व स्वच्छतादूत यांनी स्वच्छता श्रमदान मोहीमेत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments