Daily Mahasatta

Daily Mahasatta

संग्राम देशमुखांसाठी सुभाष देशमुख यांची फिल्डींग

: पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पदाधिकार्याशी चर्चा

कडेगाव ( सचिन मोहिते)

       पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर होताच भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरहून सांगलीला येऊन विविध पदाधिकार्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीत सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.

        माजी मंत्री सुभाष देशमुख म्हणाले , संग्राम देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ग्रीन पॉवर शुगर गोपुज (जि. सातारा) येथील साखर कारखान्याचे संस्थापक आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील नव्या पिढीतील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना यापूर्वीच इतर पक्षांकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्याची तयारी केली, मात्र संकटकाळात त्यांनी भाजपसोबत राहून सामंजस्य भूमिका घेतल्या आहेत. त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन योग्य निर्णय घेतला आहे.

       सुभाष देशमुख यांनी यावेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व्ह्यूहरचना व निवडणूक नियोजना बाबत त्यांनी चर्चा करीत त्यांनी संग्राम देशमुख निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तर सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी त्यांनी यावेळी घेतली. यावेळी अविनाश महागावकर, मिलिंद कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments