Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

संग्राम देशमुखांना ज्ञानेश्वर माऊलींचा आशिर्वाद : अशोकराव मोरगेकर

: कार्तिकी एकादशीला आळंदी दर्शन

पुणे :( प्रतिनिधी)
आळंदीत माऊलींचा ज्यांना ज्यांना आशिर्वाद मिळाला ते विजयी झाले आहेत. या परिसरातील सर्व संस्था भारतीय जनता पक्षाकडे आहेत. आळंदीचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असेल असा विश्वास असल्याचे अशोकराव मोरगेकर म्हणाले.

माजी मंत्री संजय बाळा भेगडे म्हणाले, ज्ञानीयाचा राजा असणाऱ्या पावन भूमीतुन संग्राम देशमुख यांना आशिर्वाद मिळाला आहे. संग्राम देशमुख म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आज कार्तिकी एकादशी आणि त्याच दिवशी माऊलींचा आशिर्वाद घेण्यासाठी ते आलेले आहेत. हा दुग्ध शर्करा योग आहे. देशातील क्रमांक एकचा पक्ष भाजप आहे. नुकत्याच बिहार सह इतर राज्यातील निवडणुका जिंकल्या आहेत. आता महाराष्ट्रातील पदवीधर विधान परिषद निवडणुका देखील आपण जिंकणार आहोत, मात्र आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले, वारकरी परंपरा असणाऱ्या या नगरीत माऊलींचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. या कार्यक्रमाला उपस्थित संस्था चालकांना सांगू इच्छितो की मी देखील काही संस्थामध्ये पदावर आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी मला माहिती आहे. नोकर भरती सारख्या महत्वाच्या विषयांना या सरकारने बगल दिली. पदवीधरांना सन्मान मिळण्यासाठी स्वतंत्र पदवीधर महामंडळाची मी मागणी केली आहे. यासाठी मी पाठवपुरावा करणार आहे. बजेट मध्ये पदवीधरांसाठी तरतूद झाली तर अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी जि. प. अध्यक्ष जालिंदर कामटे, अतुल देशमुख, आळंदी उपनगराध्यक्ष सागर बुरुंदीयाड आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, पदवीधर, शिक्षक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments