Daily Mahasatta

Daily Mahasatta

बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून विद्यार्थिनी ठार


अमरावती ( प्रतिनिधी )
       बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून झालेल्या अपघातात सोळा वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही ही घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भिलोरी या गावात घडली आहे.
        अस्मिता भिलावेकर ही सोळा वर्षाची विद्यार्थिनी बैलगाडीत बसून निघाली होती. अस्मिताही टेंभुर्णीसोंडा येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रम शाळेची विद्यार्थिनी आहे. तिच्यासोबत आई-बाबा आजी-आजोबा हे मानसून वाडी येथील मावशीला दिवाळीनिमित्त भेटण्याकरता निघाले होते. दरम्यान रस्त्यातच अस्मिता च्या गळ्यातील ओढणी बैलगाडीचा चाकात अडकल्याने तिला गळफास बसला. घटनास्थळावरील लोकांनी तिला तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र गळफास अधिक घट्ट असल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची घटना नोंदवली असून परिसरातून शोककळा पसरली आहेत. 


 

Post a Comment

0 Comments