Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी भेट

सांगली (प्रतिनिधी)
         महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. श्री. पाटील यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला.
         केंद्रातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात आज शहरातून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्या आदी ना. बाळासाहेब थोरात यांनी श्री. पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, अखिल भारतीय कॉंग्रेस सचिव व सह प्रभारी सोनल पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोहन जोशी, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, तौफिक मुलाणी, विशाल पाटील, किरण माने, ऋतूराज पाटील, प्रशांत पाटील, दिलीप पाटील, रवींद्र वळवडे, रवींद्र खराडे, बिपीन कदम, संतोष जाधव, अल्ताफ पेंढारी, नितीन चव्हाण, सनी धोतरे, आशिष चौधरी, तनिष्क जवळेकर उपस्थित होते.
------------

Post a Comment

0 Comments