Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली

कडेगाव प्रतिनिधी

 सांगली जिल्ह्यातील  साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात आज बुधवारी  ऊस दराबाबत चर्चा झाली. यामध्ये पहिली उचल म्हणून एफआरपीची रक्कम एकरक्कमी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला. त्यामुळे सांगली जिल्ह्यात होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन देखील मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे.

यावर्षीच्या गळीत हंगामात एफआरपीची रक्कम, पहिली उचल म्हणून एकरकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत झाल्याने अखेर ऊस दराची कोंडी फुटली आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात पहिली उचल एफआरपी अधिक 200 रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र बाजारातील साखरेचे दर पाहता ऊसाला एकरकमी एफआरपी देणेही कठीण असल्याने साखर कारखानदारांचे म्हणणे होते. त्यामुळे ऊसदाराची कोंडी निर्माण झाल्याने, यातून मार्ग काढण्यासाठी आज साखर कारखानदारांची बैठक कडेगाव येथे  झाली.

साखर कारखानदार आणि स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाला. तर पुढील साखरेचे बाजार भाव पाहून अधिक 200 रुपयांचा निर्णय घेण्यात येईल असे कारखानदारांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी सांगली जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments