Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महाविकास आघाडीचा पदवीधरांच्या महामंडळाला विरोध कशासाठी ? संग्राम देशमुख

 कोल्हापूर : (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीतील काही नेत्यांना आम्ही, स्वतंत्र पदवीधर महामंडळाची मागणी करणार असल्याचे खुपले आहे, पदविधरांच्या महामंडळाला या बड्या नेत्यांचा विरोध असण्याचे कारण काय ? असा सवाल पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर येथील आयोजित पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडीक अध्यक्षस्थानी होते तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माणिकराव पाटील (चुयेकर), कोल्हापूर जिल्हा शहर अध्यक्ष राहुल चिकोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ते म्हणाले, पदवीधरांचे अनेक प्रश्न आजपर्यंत या मतदार संघात चंद्रकांतदादा पाटील यांनी सोडवलेले आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी फिरत असताना अनेक पदवीधर आम्हाला चंद्रकांतदादा यांनी केलेल्या मदतीबाबत सांगत आहेत. मी त्याच तळमळीने पदविधारांची सेवा करेन, मी पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी केल्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी, त्यावर टीका केली. पण त्यांनी टीका का केली हे न समजणारे आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना पदवीधरांचे महामंडळ का नकोय, त्याला त्यांचा विरोध असण्याचे कारण काय ?, पदविधारांची दिशाभूल करता येणार नाही. या निवडणुकीत पदवीधर त्या नेत्यांना मताच्या रूपाने उत्तर देतील असा माझा विश्वास आहे. असेही ते म्हणाले. पदवीधरांच्या महामंडळाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीला पदवीधर नेस्तनाभूत करतीलच, पण जे आज चंद्रकांतदादांच्या कामांवर बोलत आहेत, त्यांनी आज पर्यंत सत्ता उपभोगली, त्यावेळी पदवीधरांसाठी काय केलं ?, गेल्या एक वर्षात अनैसर्गिकपणे का असेना सत्ता असून काय केलं याचं उत्तर आधी द्यावं, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी भाजप सरचिटणीस विजयराव जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, दिलीप मैत्राणी, नगरसेवक नाना कदम, नगरसेवक अजित ठाणेकर, नगरसेवक विजय खाडे पाटील, नगरसेविका उमाताई इंगळे, नगरसेविका रुपाराणी निकम, नगरसेवक विजय सूर्यवंशी, मा.नगरसेवक किरण नकाते, नगरसेविका सिमा कदम, पदवीधर निवडणूक प्रमुख चंद्रकांत घाटगे, मंडल अध्यक्ष भरत काळे, ,  महिला अध्यक्षा गायत्री राऊत, आरतीताई जोशी, सुलभा मुजमदार तसेच भारतीय जनता पक्ष सर्व सेलचे पदाधिकारी, मान्यवर कार्येकते पदवीधर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments