Daily Mahasatta

Daily Mahasatta

चिंचणीत शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, सुमारे दोन लाखांचे नुकसान

चिंचणी : येथील रामगिरी व बाळगिरी गोसावी यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटने जळाला आहे.

चिंचणी (कुलदीप औताडे)

        चिंचणी (अंबक) ता. कडेगाव येथील लालगिरी मठा जवळील डिपीतील विजेच्या शॉर्टसर्किटने सुमारे तीन एकरातील जवळपास साठ गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. या आगीत सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .

        चिंचणी येथील लालगिरी मठाजवळील डीपी सुमारे एक महिना बंद पडल्याने ऊस पाण्या अभावी ऊस वाळला. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शनिवारी डिपी दुरुस्त केली, मात्र दुसर्या दिवशी ही घटना रविवारी दुपारी चार च्या सुमारास शॉर्टसर्किट लागलेल्या आगीत शेतकरी रामगिरी आत्मगिरी गोसावी(391) आणि बाळगिरी प्रेमगिरी गोसावी (367 ब) यांचे या क्षेत्रातील जवळपास 60 गुंठे ऊस शेती या भीषण आगीत जळून खाक झाले .

        यावेळी महावितरण च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामे केले आहेत व पुढील कार्यवाही करु असे म्हणाले आहेत. मात्र याचा पाठपुरावा करून घेण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यास सांगितले. तलाठी व कृषी अधिकारी कडेगाव यांनी अजुन पंचनामे केले नाहीत तरी पंचनामे करून सहकार्य करावे. तसेच नोंद असलेल्या कारखान्याने लवकरात लवकर ऊस तोडणी करुन मदत करावी असे शेतकरी गोसावी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments