घर बांधण्याच्या परवानगीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे

: महाविकास आघाडी सरकारचा निर्णय
सांगली ( मनोज देवकर )
    नवीन घर बांधायचे असल्यास परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता ग्रामस्थांचे हेलपाटे, वेळ आणि पैसा वाचणार आहे, अशी माहिती लातूर चे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सोशल मीडियावर दिली आहे
     या निर्णयामुळे आता ग्रामस्थांचे हेलपाटे, वेळ आणि पैसा वाचणार आहे. बांधकाम परवान्याच्या या सुलभीकरणाबद्दल मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे , महसूल मंत्री मा बाळासाहेब थोरात , राज्यमंत्री मा अब्दुल सत्तार यांचे देशमुख यांनी अभिनंदन केले आहे .
    आजवर विना परवानगी बांधलेली घरे बेकायदेशीर बांधकाम समजली जात. दंड भरून ती नियमित केली जात असत. त्यासाठी लोकांना तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असत. या निर्णयामुळे गावातच हा प्रश्न सोडवला जाईल त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


 

Post a comment

0 Comments